@maharashtracity

धुळे: साक्री तालुक्यातील निजामपूर गावात कारवाई करीत धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने लाखो रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला. ही कारवाई मध्यरात्री उशिरा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील एलसीबी पथकाने केली.

धुळे शहरासह जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री, वाहतुकीविरुध्द पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनात सतत कारवाई केली जात आहे. याच अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना २५ रोजी रात्री १२.३० वा. सुमारास गुप्त बातमी मिळाली की, निजामपुर गावात आदर्श विद्या मंदोर समोरील वासखेडी रोडवर एक संशयीत बोलेरो पिकअप वाहन उभे आहे.

त्याप्रमाणे पोलिसांचे पथका रवाना केले असता, तेथे बोलेरो पिकअप वाहन व एक व्यक्ति उभे होते. त्याची चौकशी केली असता त्याने प्रशांत जगन्नाथ बदामे, वय-२६ वर्ष, रा.क्वालिटो प्रोव्हीजन शेजारी, निजामपुर ता.साक्री जि.धुळे असे सांगुन ते वाहन त्याचे स्वतःचे असल्याचे सांगीतले. त्यास वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता, त्याने वाहनात मिरची असल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली.

वाहनातील मालाबाबत संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल सुगंधी गुटखा पानमसाला मिळून आला. पिकअप वाहनातून एकुण रु.१३ लाख ६९ हजार ३६० रुपये किंमतीचा २०८ गोणीत भरलेला विमल सुगंधी पान मसाला गुटखा मिळून आला. हा गुटखा आणि चार लाखाचे वाहन असा एकुण २०लाख एक हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी पथकाने जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाचे पोनि. शिवाजी बुधवत, पोसई योगेश राऊत, पोसई सुशांत बळवी, पोहेको संजय पाटील, पोहेको संदीप चोरात, पोहेको प्रकाश सोनार, पोना. संतोष हिरे, पोना. संदीप सरग, पोको योगेश जगताप, पोकों, किशोर पाटील अशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here