आरोग्य सचिव नवीन सोना यांची सूचना

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यासह मुंबईतील वाढलेल्या कोविड रुग्णसंख्येवर (Covid patients) नियंत्रणासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिन आणि कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच बुस्टर डोस (booster dose) देण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी केल्या.

राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सचिव नवीन सोना यांनी सांगितले की, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सीटी व्हॅल्यू तीस पेक्षा कमी असणारा नमुना जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) पाठवला जावा. प्रिव्हेंशन डोसची संख्या वाढवावी असे सचिव सोना यांनी आढावा घेत सुचना केली. 

यावेळी आरोग्य आयुक्त धीरजकुमार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ गौरी राठोड, सहाय्यक संचालक डॉ. बबिता कमलापूर, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. सारी आणि आयएलआय सर्व्हेक्षण जास्तीत जास्त प्रभावीपणे करावे. राज्यात अद्याप साथरोग कायदा अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यातील तपासणीचे दर पूर्वीचेच दर आहेत, असे स्पष्टीकरण संचालक डॉ. अंबाडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here