@maharashtracity

मुंबईत सर्वत्र ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’ उभारण्याचा मानस

‘टॉयलेट’मध्ये महिला, पुरुषांसाठी ३८ शौचकूपे

वाॅशिंग मशिन, स्नान, मुतारी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची , पाण्याचा पुनर्वापर ‘ सुविधा’

वर्षभरात २० हजार लोकांना या टॉयलेटचा वापर करतील

पाण्याचा पुनर्वापर करून अंदाजे १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार

मुंबई: भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पूर्व उपनगरात घाटकोपर येथे भारतातील पहिले आधुनिक सेवासुविधांनी सुसज्जीत असे दुमजली ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’ (Water Recycling Community Toilet) उभारण्यात आले आहे.

या ‘टॉयलेट’मध्ये महिला, पुरुषांसाठी ३८ शौचकूपे असून वाॅशिंग मशिन, पिण्याचे पाणी, स्नान, मुतारी, शुद्ध पिण्याचे पाणी, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील विविध सार्वजनिक सेवासुविधांमध्ये आणखीन एका आधुनिक सुविधेची भर पडली आहे.

वर्षभरात २० हजार लोकांना या टॉयलेटचा माफक दरात वापर करता येणार आहे. तसेच, या टॉयलेटमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून अंदाजे १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यात येणार आहे.

घाटकोपर (पश्चिम), जगदुशानगर नजीक शिवस्फुर्ती मंडळ येथे ‘ हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या सौजन्याने, मुंबई महापालिका आणि एचएसबीसी यांच्या सहभागातून स्थानिक नगरसेविका डॉ.अर्चना संजय भालेराव व माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रयत्नाने
भारतातील पहिले ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’ उभारण्यात आले आहे.

या आधुनिक टॉयलेटचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजेंद्र राऊत आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी maharashtra.city शी बोलताना दिली आहे.

सर्वत्र असे टाॅयलेट’ उभारण्याचा प्रयत्न

घाटकोपर येथे महापालिका व खासगी सहभागातून पहिले ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’ उभारण्यात यश आल्याने आता संपूर्ण मुंबईत अशा प्रकारचे ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’ उभारण्याचा प्रयत्न पर्यटन,पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा मानस असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे या टॉयलेटची पाहणी करुन अधिक माहीती घेण्यासाठी मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या सोबत मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी या टॉयलेटच्या उदघाटनाप्रसंगी उपस्थिती दर्शवणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here