महापालिकेच्या सायन रुग्णालयाचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा

Twitter: @maharashtracity

मुंबई: प्रत्येक तरुणाने जीवनात कष्टाला महत्व दिले पाहिजे. प्रामाणिकपणे काम केल्यास उद्देश साध्य करता येऊ शकतो. शिस्तबद्ध महत्वाचे आहे. तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर रहा, असे सांगत लाचलुचपत प्रतिबंधक खाते पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. नांगरे-पाटील हे महानगरपालिकेचे सायन रुग्णालयाच्या ७६ व्या वर्धापन दिनी संबोधित करत होते. 

शेतकरी कुटूंबात जन्म घेतलेल्या विश्वास नांगरे- पाटील यांनी भाषणातून शिक्षकांमुळे आपल्या आयुष्याला वेगळे योग्य वळण लाभल्याचे सांगितले. शारिरीक फिटनेससाठी दक्ष असणारे नांगरे पाटील यांनी स्वतःचे शिस्तबद्ध राहणीमान विषद केले. प्रतिबंधक औषधशास्त्राचे महत्त्व सांगत आपल्या खुमासदार शैलीत कधी मराठी तर कधी इंग्लिश भाषेतील कवनांतून संवाद साधला. त्यानंतर या जागतिक शांतिसंदेश देणारे प्रेमकूमार रावत यांचा संदेशपर व्हिडीओ येथे दाखविण्यात आला.

दरम्यान, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकिय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालयाचा ७६ वा वर्धापन दिन २४ तसेच २५ एप्रिल रोजी दिमाखात साजरा करण्यात आला. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सन्मान सोहळे, प्रबोधनात्मक संवाद आणि बरेच काही झाले असल्याचे सांगितले. २४ एप्रिल रोजी रुग्णालयातील गुणी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता या सोहळ्यासाठी उपस्थित होते. तसेच संचालक डॅा नीलम आंद्रादे यांच्यासह सहआयुक्त सेंट्रल पर्चेस विभागाचे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुजाता पोळ व डॉ संजीवनी सोनवे यांनी केले. दुपारी विद्यार्थ्यांनी ’नाट्योदय‘ हे दोन अंकी नाटक सादर केले. दरम्यान, अधिष्ठाता डॅा मोहन जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर डॉ वृंदा कोलते यांनी पाहुण्यांची ओळख सभागृहास करून दिली व सूत्रसंचालन केले. 

भाषणाच्या प्रारंभीच विश्वास नांगरे – पाटील यांनी शीव रुग्णालयाचे, स्टाफ डॅाक्टर्सचे मनापासून जाहीर कौतुक केले. दुपारी ‘रंगतरंग’ हा नृत्य गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास बॉलीवुडमधील ज्येष्ठ कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी स्पेशल कामिओ परफॉर्मन्स केला. यावेळी प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद लाभला. तर डॉ. शारदा नेर्वेकर यांनी भन्नाट शैलीत सूत्रसंचालन केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here