चोवीस तासात तब्बल ४९६ रुग्णांची भर

राज्यात ७२२ नवे रुग्ण

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी २२६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद होती. तर मंगळवारी ७२२ रुग्णांची नोंद झाली. यामुळे गेल्या चोवीस तासात तब्बल ४९६ रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले. आता राज्यातील कोरोना रुग्णांची ८१,६२,८४२ एवढी संख्या झाली आहे. 

तसेच काल ९४६ अशा मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ८०,०८,७८६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात तिघा कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६८,१९,८७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,६२,८४२ (०९.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी राज्यात १७,००७ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी १३,५१८ सरकारी प्रयोगशाळेत, ३,२१२ खासगी प्रयोगशाळेत तर २७७ सेल्फ टेस्ट झाल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात एक्स बी बी १.१६ व्हेरिएंटचे ८७७ रुग्ण सापडले असून त्यापैकी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी १ जानेवारीपासून आजपर्यंत ८९ कोरोना रुग्णाचे मृत्यू झाला. यापैकी ७१.९१ टक्के रुग्ण साठ वर्षावरील, ८७ टक्के सहबाधित तर १३ टक्के रुग्ण सहबाधित नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यात २४ एप्रिल पर्यंत ५७७६ रुग्ण सक्रिय असून ५५२९ म्हणजे ९५.७ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २४७ म्हणजे ४.३ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर २०२ रुग्ण साधारण वॉर्डात उपचार घेत असून ४५ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. साप्ताहिक अहवालानुसार १९ ते २५ एप्रिल या आठवड्यात ५ हजार ५४९ रुग्ण आढळून आले.  

आरटीपीसीआर तसेच जीनॉम चाचणी :

राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १९,९०,०९६ एवढे प्रवासी आले असून यातील ४४,९७६ प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर ९८ जणांचे नमुने जिनॉमसाठी पाठविण्यात आले.

मुंबईत १९१ नवे रुग्ण

मुंबईत मंगळवारी १९१ रुग्ण आढळले असून आता मुंबईतील रुग्णांची संख्या ११,६१,२१४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून १९७६२ एवढी मृत्यूची संख्या झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here