१० मे पर्यंत आरक्षण झाले फुल्ल

Twitter: @maharashtracity

मुंबई: अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सुरु केलेल्या डिलाईल रोड ते कोल्हापूर या एसटीला उदंड प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूरला जाण्यासाठी १० मे पर्यतचे आरक्षण ८० टक्के फुल्ल झाले असल्याचे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले. तर नागरिक परतीच्या प्रवासासाठी देखील गाड्यांचे आरक्षण करत आहेत. 

मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डिलाईड रोड, परेल, करीरोड या परिसरात मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकाचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून डिलाईड रोडवरुन एसटी सुरु करण्याची मागणी महामंडळाकडे केली होती.  

दिनांक २२ एप्रिलला येथून १५ एसटी चालविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. शनिवारपासून सुरु झालेल्या एसटी महामंडळाच्या वाहतुकीला येथील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथून गाड्या सुरु झाल्याचे समजल्याने नागरिक येऊन चौकशी करुन आरक्षण करत असल्याची माहिती महामंडळाने दिली. एसटीचे आरक्षण दोन महिने आधी करता येते. त्यामुळे नागरिक जातानाचे आणि येतानाचे आरक्षण करीत असल्याचे अधिकारी सांगतात. 

परतीच्या प्रवासासाठी २१ जूनपासून या गाड्यांचे आरक्षण झाले आहे. तर कोल्हापूरला जाण्यासाठी १० मे पर्यतचे सर्व गाड्यांचे ८० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. परळ आणि मुंबई सेंट्रल आगारातून सुटणाऱ्या एसटी भारतमाता चौक मार्गे डिलाईड रोडवरील थांब्यावरुन सध्या धावत आहेत.

दरम्यान,  डिलाईड रोड परिसरातील नागरिकांनी आजरा, लिंगनुर आणि मलिग्रेकरिता एसटी चालविण्याची मागणी केली आहे. येथून दररोज कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यासाठी सुमारे १० ते १५ ट्रव्हल्स सुटतात. परंतु सध्या उन्हाळी सुट्टीमुळे त्यांचे तिकिट दर १२०० ते १५०० रुपये पर्यंत आहेत. एसटीच्या महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक सवलतीचा फायदा येथील नागरिकांना होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी महामंडळाने आणखी गाड्या सोडण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे.

डिलाईड रोड मार्गे शयन आसनी गाड्या
परळ – पाटगाव संध्याकाळी ६
मुंबई सेंट्रल – कोल्हापूर रात्री ८.३०
परळ – कोल्हापूर रात्री ११

परळहून सुटणाऱ्या साध्या गाड्या

परळ – चंदगड सकाळी ६
परळ – राधानगरी सकाळी ७
परळ – हत्तीवडे सकाळी ७
परळ – कागल स.७.१५,९ आणि ११.१५
परळ – गारगोटी स.७.४५ वा
परळ-  राधानगर स.८.३०
परळ- नेसरी संध्याकाळी ७

मुंबई सेंट्रलहून डिलाईड रोडमार्गे धावणाऱ्या गाड्या

मुंबई सेंट्रल – कोल्हापूर स.८.४५ साधी
मुंबई सेंट्रल – कोल्हापूर दु.१२.३० हिरकणी
मुंबई सेंट्रल – कोल्हापूर संध्याकाळी ७.१५ शिवशाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here