महाराष्ट्रातील मार्ड संघटनेचा केरळ डॉक्टरांच्या संपला पाठिंबा

Twitter: @maharashtracity

मुंबई: केरळमध्ये डॉ. वंदना दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात त्या डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना मध्यवर्ती मार्ड संघटना संतापली असून या घटनेचा निषेध म्हणून काळी फित लावून काम करणार असल्याचे मध्यवर्ती मार्डचे (MARD) अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांनी सांगितले. तसेच केरळमधील डॉक्टरांच्या संपाला (doctors’ strike in Kerala to protest death of woman doctor) पाठींबा देत आज ११ मे २०२३ रोजी कर्तव्यावर असताना डाव्या हाताली काळी फिती लावून काम करणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मध्यवर्ती मार्ड संघटनेने ’देशात अजून किती डॉक्टरांचे बळी जातील असा सवाल उपस्थित केला आहे. केरळमधील कोट्टाराकारा तालुका रुग्णालयात कर्तव्यावर असताना झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर डॉ. वंदना दास यांचे निधन झाल्याच्या वृत्ताने राज्यातील मध्यवर्ती मार्ड संघटनेला धक्का बसला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एवढ्या हुशार तरुण डॉक्टराचे स्वप्न विरले. या घृणास्पद आणि अमानुष कृत्याचा मध्यवर्ती मार्ड संघटना निषेध केला आहे. दोषीला तात्काळ अटक करुन सर्वोच्च शिक्षेची मागणी करत असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

देशातील डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी आणि डॉक्टरांवरील अत्याचारासाठी कडक कायदे करण्याची मागणी मध्यवर्ती मार्डने केली आहे. तसेच केरळमधील डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा म्हणून राज्यातील निवासी डॉक्टर ११ मे २०२३ रोजी कर्तव्यावर असताना डाव्या हाताली काळी फिती लावून काम करणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here