Twitter: @maharashtracity

मुंबई: कोविड तसेच इतर आजारांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु असताना आरोग्य विभागाने गेल्या पाच महिन्याची राज्यातील इन्फ्ल्युएंझाचे रुग्ण सांगितले. यानुसार ही आकडेवारी मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात १ जानेवारी ते ५ मे २०२३ अखेरपर्यंत इन्फल्युएंझा या आजाराचे एकूण ४,९३,६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय सध्या एच१एन चे ५५२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर एच३एन२ चे ४७९ रुग्ण आढळले आहेत.

आजघडीला ६० रुग्ण राज्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल आहेत. एच१एन१ चे ३ मृत्यु झाले आहेत. तर एच३एन२ च्या ६ रग्णांचा मृत्यु झाला असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आह. २९४० संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. ताप, खोकला. घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया या आजाराची लक्षणे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here