मुंबईत ५०० तर राज्यात रोज १५०० युनिटची मागणी

Twitter: @maharashtracity

मुंबई: सुट्टयांमुळे राज्यातील रक्तसाठा आटला असून पुरेशा रुक्त संकलनासाठी रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. उन्हाळी सुट्टयांमुळे महाविद्यालये बंद झाली आहेत. या काळात रक्तसाठा आटतोच असा पूर्वीचा अनुभव आहे. तुर्तास आगामी वीस दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने रक्तदानासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आवाहन केले जात आहे.

दरम्यान, मुंबईत दररोज ५५० युनिट रक्त तर राज्यात १,५०० युनिट रक्ताची गरज असते. तुर्तास राज्यात ५८ हजार ८१८ युनिट रक्त साठा उपलब्ध आहे. हा रक्त साठा आगामी वीस दिवस पुरेल इतका असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी तसेच संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांनी केले आहे.

अपघात झालेल्या जखमींना शिवाय शस्त्रक्रियेदरम्यान आणि थॅलेसेमिया इतर रुग्णांसाठी रक्तांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. ही दैनंदिन रक्त गरज उपलब्ध रक्तसाठ्यातूनच केली जाते. या रक्तपेढयांमध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्ताचा पुरवठा केला जातो. या संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असल्यानेच रक्तसाठ्याची उपलब्धता होते. सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने लोक आपापल्या गावी जातात. त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करत रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

राज्यात ३५०, तर मुंबईत ५७ रक्तपेढ्या असून एकट्या मुंबईला दररोज साधारण ५५० युनिट पर्यंत रक्त रुग्णालयांमध्ये लागते. सध्या २० दिवस पुरेल इतका रक्तसाठा असला तरी रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदानाचे आवाहन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here