Twitter: @maharashtracity

मुंबई: मायडिजिरेकॉर्ड्स (एमडीआर) व्‍यक्‍तींना त्‍यांच्या हेल्‍थ डेटाचे व्‍यवस्‍थापन व नियोजन करण्‍यास सक्षम करतो, तसेच सरकारला हेल्‍थ रेकॉर्ड्सच्‍या (आरोग्‍याबाबत नोंदी) परिपूर्ण डिजिटायझेशनची अंमलबजावणी करण्‍यामध्‍ये साह्य करतो. या ब्रॅण्‍डने आज त्‍यांचे उल्‍लेखनीय, सर्वसमावेशक हेल्‍थकेअर सोल्‍यूशन सादर केले.

मायडिजिरेकॉर्ड्सच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सरोज गुप्‍ता म्‍हणाल्‍या, “आम्‍ही आमचे नवीन अॅप्‍लीकेशन सादर करत असताना आम्‍हाला उल्‍लेखनीय सोल्‍यूशन सादर करण्‍याचा आनंद होत आहे. हे सोल्‍यूशन आरोग्‍यसेवा व्‍यवस्‍थापनामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल. आमचे व्‍यासपीठ व्‍यक्‍तींना केंद्रीकृत रेकॉर्ड-किपिंग, लसीकरण ट्रॅकिंग व औषधोपचार व्‍यवस्‍थापनाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यास सक्षम करते. आम्‍ही अॅप सादर करण्‍यासह भारतात आरोग्‍यसेवा डिजिटायझेशनच्‍या नवीन युगाची सुरूवात देखील करत आहेत. मायडिजिरेकॉर्ड्स आरोग्‍यसेवेबाबत सक्रिय निर्णय घेण्‍यास साह्य करण्‍याप्रती कटिबद्ध राहिले, ज्‍यामुळे सर्व व्‍यक्‍तींचा जीवनाचा दर्जा सुधारेल.”

आपल्‍या नाविन्‍यतेसह एमडीआर रूग्‍णाची मेडिकल हिस्‍ट्री, चाचणीच्‍या निष्‍पत्ती आणि लसीकरण नोंदी सहजपणे उपलब्‍ध व व्‍यवस्‍थापित करत भारतातील आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टममध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यास उत्‍सुक आहे. प्रमाणीकृत व इंटरऑपरेबल प्लॅटफॉर्म सर्व नोंदी ठेवण्‍यासंदर्भातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी सोईस्‍कर सोल्‍यूशन प्रदान करत आहे. ज्‍यामुळे कागदोपत्री असलेल्‍या नोंदींचे नुकसान आणि इलेक्‍ट्रॉनिक सिस्‍टम्‍समध्‍ये येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्‍यास मदत होत आहे. या कार्यक्षम, रूग्‍ण-केंद्रित सिस्‍टमच्‍या माध्‍यमातून रूग्‍णांची काळजी घेण्‍यामध्‍ये वाढ करण्‍यात येईल. तसेच ही सिस्‍टम योग्‍य निर्णय घेण्‍यामध्‍ये देखील साह्य करेल.

नवीन अत्‍याधुनिक मायडिजिरेकॉर्ड्स अॅपमध्‍ये अनेक अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत, जी व्‍यक्‍तीच्‍या हेल्‍थ डेटाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये मदत करतील. वापरकर्ते एकाच सुरक्षित ठिकाणी मेडिकल हिस्‍ट्री, लसीकरण, प्रीस्क्रिप्‍शन्‍स अशा त्‍यांच्‍या मेडिकल रेकॉर्ड्स स्‍टोअर व व्‍यवस्‍थापन करू शकतील. तसेच हा प्लॅटफॉर्म आयुष्‍मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) सह प्रमाणित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here