@maharashtracity

धुळे: पदविकाधारक पशुवैद्यकीय डॉक्टरांचे काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यांनी आता १ ऑगस्टपासून संपही पुकारला आहे. या संपामुळे शेतकर्‍यांचे हाल होणार आहेत. त्यामुळे आंदोलनावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्मण सेनेने (MNS) केली आहे.

याविषयी मनसेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पशुवैद्यकीय डॉक्टर व डिप्लोमा धारकांच्या काम बंद आंदोलनामुळे १९ दिवसांपासून शेतकर्‍यांच्या दुधाळ जनावरांसह अन्य पाळीव जनावरांवर वेेळेत उपचार होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

त्याचबरोबर पावसाळा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढले आहेत. पशुवैद्यकांच्या संपावर तोडगा काढण्यात यावा, पशुवैद्यकीय सेवा प्रत्येक जिल्ह्यात गाव पातळीवर पुन्हा सुरू करण्यात यावी, डॉक्टरांची तसेच डिप्लोमा धारकांनी यापूर्वी केलेली सेवा तसेच त्यांच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस अजितसिंह राजपूत, जिल्हा सरचिटणीस संदीप जडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, शहराध्यक्ष अमिषा गावडे, चारुशीला खैरनार, उषा कापडणीस, शहर उपाध्यक्ष प्रशांत तनेजा, विभाग अध्यक्ष अक्षय शिंदे, सतीश पाटील आदींसह पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here