आरोग्य विभागाचा साप्ताहिक अहवाल

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यातील कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्यात घट झाली असल्याची बाब सार्वजनिक आरोग्य विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आली. दरम्यान, जिल्हा- जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने दैनंदिन करोनाबाधित रुग्णांचा दर कमी झाला असल्याचा निष्कर्ष अहवालातून मांडण्यात आला आहे.

राज्यात गेल्या आठवडाभरात दररोज किमान एक तरी मृत्यू नोंद आहे. तर ४ मे रोजी ४ मृत्यू नोंदविण्यात आले. कोविड-१९ मुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना आता यश येत असल्याचे घटत्या रुग्णसंख्येतून समोर येत आहे. या आठवड्यात मृत्यूदर ०.३६ वरुन घट होत ०.२६ इतक्यावर आला आहे.

राज्यातील प्रयोगशाळांकडून दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात कोरोना बाधितांचा दर ६.३ होता. हा दर आता ४.३ इतक्यावर आला आहे. तर मागील आठवड्यात दररोज सरासरी १४,५०० इतक्या कोविड तपासण्या केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here