@maharashtracity

साक्रीत जनआशिर्वाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद!

धुळे: नागरिकांच्या सेवेसाठी मोदी सरकारमधील (Modi Sarkar) सर्वच मंत्री कटिबध्द आहेत. कुठल्याही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. त्या संदर्भात आम्हाला तसे आदेश करावेत. मोदींच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन राज्यमंत्री डॉ.पवार यांनी केले.

जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Dr Bharati Pawar) यांची बुधवारी सायंकाळी साक्री शहरातून जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Rally) निघाली होती. या यात्रेचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

कार्यक्रमादरम्यान डॉ.भारती पवार यांनी आदिवासी बांधवांसोबत आदिवासी नृत्य केले. खासदार डॉ. हिना गावितही (MP Dr Heena Gavit) नृत्यात सहभागी झाल्या होत्या. यानंतर मंत्री डॉ.पवार यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून जनआशीर्वाद यात्रा काढत नागरिकांना अभिवादन केले.

कार्यकर्त्यानी मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील एका चहाच्या दुकानात मंत्री डॉ.भारती पवार यांनी स्वतः नागरिकांना चहा वाटून चाय पे चर्चा केली. शहरातील अनेक चौकांत या जनआशीर्वाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत झाले.

खासदार डॉ. हीना गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, भाजपचे पिंपळनेर मंडळाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here