प्रयोग यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती होईल – धनंजय मुंडे

Twitter : SantoshMasole

जळगाव

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन करून एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली आहे. ही जैविक पावडर पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही, असा दावा इंजिनीयर सुनील पवार यांनी केला आहे. या पावडरचे पेटंटदेखील सुनील पवार यांनी नोंद केले आहे.

या संशोधनाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत सुनील पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. कृषी विद्यापीठातील तज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे. या टीमचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

मका व अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली आहे. दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जैविक पावडर मध्ये आहे. त्यामुळे कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे.

पेरणीपासून ते पिकांना पाणी देण्याच्या काळात देखील सुनील पवार यांनी संशोधन केलेली जैविक पावडर दीड ते दोन महिने पाणी नसले तरी पिकांना जगवु शकते. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला तर शेती क्षेत्रात क्रांती घडवणारा हा निर्णय ठरेल, तसेच दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागात देखील ही पावडर एक प्रकारचे वरदान ठरणार आहे. म्हणूनच चाळीसगाव जि. जळगाव येथे आम्ही लवकरच कृषी विद्यापीठाच्या तज्ञांची एक टीम सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत. या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Previous articleथायरॉईडवर मायक्रोवेव्ह एब्लेशनने दहा मिनिटात सुक्ष्म शस्त्रक्रिया
Next articleकला शिक्षक व निसर्ग चित्रकार दत्तात्रय शिंदे यांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन
Santosh Masole
सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here