By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: राज्याचा विधीमंडळात सादर झालेला सन-२०२२-२३चा अर्थसंकल्प (Maharashtra budget) हा फसवा, सुमार आहे. त्यात पूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी नाही. वास्तविक देशाच्या प्रगतीसाठी राज्याचे योगदान त्यातून दिसायला हवे होते, ते दिसत नाही. त्यामुळे हा भविष्याचा वेध नसलेला अर्थसंकल्प आहे. हे राज्य कृषी प्रधान व्यवस्थेकडून खुर्चिप्रधान व्यवस्थेकडे गेले, अशी टीका भाजप ज्येष्ठ सदस्य, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (BJP MLA Sudhir Mungantiwar) यांनी आज विधानसभेत केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना मुनगंटीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, या अर्थसंकल्पात पूर्वीचेच मुद्दे, पूर्वीच्याच घोषणा दिसतात. मात्र अंमलबजावणी नाही. उदाहरण म्हणून त्यांनी रिंगरोड, शिर्डी विमानतळ, अमरावती विमानतळ संदर्भातील कामांची उदाहरणे दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या नावाने योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी योजना यांचा विसर पडला याकडे लक्ष वेधले.

मुनगंटीवार म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर सवलत दिली. मात्र, राज्य सरकारने दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराज योजनेसाठी पैसे नाहीत, विदर्भात (Vidarbha) अधिवेशन नाही, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ (Marathwada Statutory Development Board) रद्द केले. हे विकासाची कवच कुंडले काढून घेण्यासारखे आहे. हे वाईन विकून तिजोरी फाइन करणारे सरकार आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here