@maharashtracity

मुंबई: पहिल्याच पावसाचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरी सब वे व अन्य सखल भागात पाणी साचले (water logging). पालिका यंत्रणा तोकडी पडली. सत्ताधारी शिवसेनेच्या (Shiv Sena) कामांची पोलखोल झाली आहे. एकूणच पावसाळी उपाययोजनांत पालिका (BMC) यंत्रणा नापास झाली आहे, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केली आहे.

त्यांनी भर पावसात शुक्रवारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला (Disaster Management Department) भेट देऊन पाहणी केली व पावसाळी कामे, उपाययोजना यांबाबत माहिती जाणून घेतली.

मुंबईत गुरुवारी २२० मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे अंधेरी, मिलन सब वे येथे पाणी साचले. वाहतूक विस्कळीत झाली. हिंदमाता येथे पाणी साचल्याने पालिकेने वाहतूक सुरळीत राखण्यासाठी रॅम्प जरी उभारले असले तरी हिंदमाता पुरमुक्त करण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या भरुन वाहू लागल्या आहेत. ब्रिटानिया पंपिग स्टेशनवर तीच परिस्थिती होती. याची गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्यांचा (Underground Water Tank) प्रकल्प, ही तात्पुरती व्यवस्था असून वास्तविक पावसाळापूर्व नियोजित व्यवस्था करण्यात पालिका नापास झाली आहे, असे आमदार शेलार यांनी म्हटले आहे.

पालिकेत भाजपची सत्ता

राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर नव्याने सरकार स्थापन झाले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात तुम्ही मंत्री होणार का, असा सवाल पत्रकारांनी त्यांना विचारला. मात्र त्यावर, मी भाजपची (BJP) सत्ता पालिकेत आणण्यासाठी कामाला लागलो आहे, असे सोयीचे उत्तर देत प्रश्नाला बगल दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here