@maharashtracity

काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मोदींच्या घोषणेवर बोचरी टीका

मुंबई: अखेर तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केल्याने शेतकरी आंदोलन आणि एकजुटीचा विजय झाला आहे. आता ताकद दाखवून, निवडणुकीत हरवा आणि भाजपची जिरवा’ असे आवाहन काँग्रेसचे (ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत (Congress leader Dr Nitin Raut) यांनी केले आहे.

शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत (Farmers leader Rakesh Tikait) यांनी केलेल्या मागण्यांचे समर्थन डॉ. राऊत यांनी केले आहे. किमान आधारभूत किंमतीची (MSP) हमी देणारा कायदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter session of Parliament) पारीत केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri) येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्याबद्दल आपण संवेदनशील असल्याचे मोदींनी दाखवून द्यावे, असे आवाहनही डॉ राऊत यांनी केले आहे.

या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी, शेतकरी आंदोलनात गेलेल्या शेकडो बळीबद्दल मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या खास भांडवलदार मित्रांसाठी आपली सत्ता राबविण्याचे धोरण व त्यांचा अहंकार आणि दुराग्रह यामुळे तिन्ही कृषी विषयक कायदे रद्द व्हावे यासाठी शेकडो शेतकऱ्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं.
जालीयनवाला बाग हत्याकांडासारखं मोदी सरकारने शेतकऱ्यांचं गेल्या वर्षभरात हत्याकांड केलं आहे, असा आरोप डॉ नितीन राऊत यांनी केला.

ते म्हणाले, तीन कृषी कायदे रद्द करून मोदी सरकारने कोणतेही उपकार केलेले नाही वा राजकिय समंजसपणा देखील दाखवलेला नाही. उलट शेतकऱ्यांनी बलिदानाने आपला हक्क परत मिळवला आहे. म्हणून हा शेतकऱ्यांचा विजय आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. हा लोकशाहीचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा विजय आहे.

या विजयासाठी मी संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व नेत्यांचे व लाखो शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. हे कायदे रद्द व्हावे यासाठी शेतकऱ्यांसोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) दिल्ली ते ग्रामीण पातळीवर काँग्रेसजन रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या सर्व काँग्रेसजनांचे आणि सर्व समविचारी पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांचेही डॉ. राऊत यांनी अभिनंदन केले.

जोवर हे कायदे संसदेत रद्द होत नाहीत तोवर केवळ मोदींनी घोषणा केली म्हणून शेतकरी नेते व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन कायम ठेवावे असे मला वाटते,असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here