नवाब मलिकांनी सर्वप्रथम केला होता भ्रष्टाचाराचा आरोप

By Anant Nalawade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकून भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

समीर वानखडे हा एक भ्रष्टाचारी अधिकारी आहे असा आरोप सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी केला होता, ही आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज करून दिली.

समीर वानखेडेच्या काळात हाय प्रोफाईल धाडी व त्या माध्यमातून करोडो रुपयांची वसुली हा अवैध धंदा समीर वानखडे व त्यांचे साथीदार करत होते हे ठळकपणे नवाब मलिकांनी सांगितलं होतं.

आर्यन प्रकरणात कशा पद्धतीने साक्षीदारांच्या सह्या कोऱ्या कागदावर घेण्यात आल्या व एका साक्षीदाराची अकस्मात मृत्यू देखील झाली ही गोष्ट जनता विसरलेली नाही. नवाब मलिक यांनी केलेले आरोप आज सिद्ध झाले याचे समाधान महेश तपासे यांनी मानले.

समीर वानखडे यांच्या राहत्या घरी सीबीआयची धाड पडली भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या सर्व गोष्टीतून तत्कालीन मंत्री नवाब मलिकांनी घेतलेली भूमिका ही रास्त होती असे मत तपासे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here