“आनंदाचा शिधा” वाटपावेळी नरेंद्र पवारांचे प्रतिपादन!

@maharashtracity

कल्याण: स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून देशभरात नागरिकांना अल्प दरात गहू, तांदूळ दिले जाते, मात्र शिंदे – फडणवीस सरकारने पहिल्यांदाच दिवाळीच्या निमित्ताने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना आनंदाचा शिधा या योजनेतून दिवाळीचे साहित्य दिले. अवघ्या शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो चना डाळ आणि एक किलो रवा दिला. त्याचे वाटप कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांच्या हस्ते गंधार नगर, खडकपाडा येथील स्वस्त धान्य दुकानात करण्यात आले.

सामान्य नागरिकांच्या घरीही आनंदाची दिवाळी (Diwali)5 साजरी व्हावी यासाठी सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय आहे. गोरगरिबांना त्यामुळे मोठा हातभार लागला आहे. सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल त्या दरात त्यांना दिवाळीचा शिधा उपलब्ध केल्याने सामान्य कुटुंबाची दिवाळी खरोखरच आनंदाची झाली असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी पुरवठा अधिकारी एकनाथ पवार व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here