Twitter: @maharashtracity

मुंबई: श्री राम सेना हिंदूस्थान संघटना बेळगाव तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा घेतली. श्रीराम सेना (Sri Ram Sena) हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र एकीकरण समिती नेते (बेळगाव) रमाकांत कोंडुसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भुमिकेस पाठिंबा दर्शविला. तसेच श्रीराम सेना हिंदूस्थान संघटनेचे संघटक प्रमुख चंद्रकांत कोंडूसकर (बेळगाव) यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह समर्थन देत पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश देत स्वागत केले.

दरम्यान, सीमाभागातील सद्यस्थिती जाणुन घेत उद्धव ठाकरे यांनी ते आणि त्यांचा पक्ष सीमा भागातील मराठी बांधवांच्या सोबत असून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. श्रीराम सेना हिंदूस्थान संघटनेचे संघटक प्रमुख चंद्रकांत कोंडूसकर यांनी सीमा भागात होत असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सोबत भविष्यात जोमाने काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत कुयाळकर, श्रीरामसेना महानगर अध्यक्ष बेळगाव, रोहित जांभळे, भरत पाटील, बळवंत शिदोलकर आदींसह मुंबईतील शिवसैनिक अमोल चव्हाण, कोल्हापूर ग्रामीण युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश कुंभिरकर आणि उद्योजक डॉ. प्रशांत कोंडूसकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here