@maharashtracity

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. याच दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी आवडत्या स्वरसम्राज्ञीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

सोमवारी १२२ वॉर्ड पवई (Powai) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS) लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पवईतील दीदींचा चाहतावर्ग उपस्थित होता.

लता मंगेशकर याना कोणीच विसरु शकत नाहीत. त्यांची स्मृती गीतातून अजरामर राहीलच. पवईकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहत स्मरण केले असल्याचे मनसे उपशाखा अध्यक्ष राहुल कदम यांनी सांगितले.

यावेळी प्रामुख्याने उपविभाग प्रमुख शैलेश वानखेडे, शाखा अध्यक्ष अरुण बालन, महिला शाखा अध्यक्ष सुजाता चव्हाण, उप शाखा अध्यक्ष राहुल अप्पा कदम, चेतन शिंपी, विठ्ठल वाघमारे, प्रविण गायकवाड, आशुतोष गायकवाड, प्रविण नाडार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here