@maharashtracity

By मिलिंद माने

मुंबई: मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून दरवर्षी पारंपारिक पद्धतीने होणारा दसरा मेळावा व शिवसेनेतून फुटून निघालेले बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून बीकेसी मैदानावर आयोजित केला जाणारा दसरा मेळावा, या दोन्ही मेळाव्यासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोल नाक्यावर आतपासून वाहतुकीची कोंडी (traffic congestion) निर्माण झाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे येणारे सर्व रस्ते वाहतूक कोंडीमुळे ठप्प होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पारंपारिक पद्धतीने दरवर्षी साजरा केला जाणारा शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी (Dusshera Melawa) शिवसैनिक एक दिवस आधीच मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे येण्यास निघाले आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर (BKC ground) दसरा मेळावा आयोजित केला आहे. यासाठी चाळीस आमदारांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्यासाठी खाजगी तसेच एसटी वाहतुकीद्वारे कार्यकर्त्यांना आणण्यास सुरुवात झाली आहे.

त्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांद्वारे येत असल्याने मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाक्यावर आताच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मेळाव्यासाठी काही तास बाकी असताना आताच वाहतूक कोंडीने उग्ररूप धारण केले असेल तर बुधवारी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज न केलेलाच बरा, अशी चर्चा खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी वर्तवली आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे (Mumbai – Pune express way) वरील वाहतूक कोंडीने ज्याप्रमाणे उग्ररूप धारण केले आहे तशीच अवस्था उद्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai- Goa Highway) क्रमांक 66 वर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातून येणाऱ्या ठाकरे गटाबरोबर शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असणार आहे. जी परिस्थिती मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील रस्त्यावर झाली आहे, तशीच परिस्थिती मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून झालेली पाहण्यास मिळणार आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या रस्त्यावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ज्याप्रमाणे वाहतूक कोंडी होणार आहे तशीच अवस्था पालघर (Palghar) जिल्ह्यातून येणाऱ्या वसई (Vasai), विरार (Virar) येथील कार्यकर्त्यांमुळे अहमदाबाद महामार्गावर होणार आहे.

मुंबईतील ठाकरे व शिंदे गटांच्या मेळाव्यामुळे मुंबई, पनवेलपासून तर ठाणे जिल्ह्यात भिवंडीपासून तसेच मुंबई – अहमदाबाद महामार्ग, ठाण्याकडून घोडबंदरमार्गे (Thane – Ghodbunder road) जाणाऱ्या महामार्गावर देखील अशीच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आज मध्यरात्रीपासून पाहण्यास मिळणार आहे.

या सर्वांचा परिणाम किमान दोन दिवस मुंबईतील वाहतूक कोंडीवर होवू शकेल, सिग्नल यंत्रणा (signal) कोलमडेल अणि वाहतुकीचे तीन तेरा वाजतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांची देखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here