@maharashtracity

धुळे: राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने (MVA) घेतला असून यासाठी राज्याच्या अधिवेशनात तसेच आरोग्य विभागाकडे आ. कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी सतत पाठपुरावा केला होता.

याबाबत माहिती देतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकित गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रश्‍नावर निर्णय घेण्यात आला.

राज्यात एकूण ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ३ हजार ५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. यासाठी आ. कुणाल पाटील यांनी वारंवार राज्याच्या होणाऱ्या विविध अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करुन आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली होती.

ग्रामीण भागात घरोघरी आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करीत असतात. ग्रामीण भागात गरोदर मातांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेवून जाणे, लसीकरण करणे, आरोग्य सर्व्हेक्षण करणे, साथीच्या रोगांची माहिती देत जनजागृती करणे, अशी कामे त्यांना करावी लागतात.

तसेच करोनासारख्या महाभयानक आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी खऱ्या अर्थाने जीवाची पर्वा न करता योध्दा म्हणून भूमिका पार पाडली आहे. त्या बदल्यात त्यांना अत्यल्प मोबदला दिला जातो. त्यामुळे मोबदल्यात वाढ करावी, अशी मागणी वारंवार लावून धरली होती.

यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here