Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यासह मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या शून्यावरून उसळी घेतल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार राज्यात इन्फ्लएंझाचे २१५५ रुग्ण आहेत. यातील १२६ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर राज्यात मलेरियाचे एकूण ८०४० रुग्ण असून यातील ६ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. मात्र राज्यातील मलेरियाच्या एकूण टक्केवारीत ८० टक्के रुग्ण गडचिरोली आणि मुंबईत असल्याचे सांगण्यात आले. तर डेंग्यूच्या रुग्णांत गेल्या आठवड्याच्या तुलनेत ग्रामीण भागात, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णसंख्या शून्य वरून ४९ वर पोहोचली आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ वरून २६ वर पोहचली आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात ३५२६ तर मुंबई २८८६ इतके मलेरिया रुग्ण आहेत. तसेच राज्यात डेंग्यू रुग्णांची एकूण संख्या ४४४८ असून यात एकाचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. तर मुंबईत १३२३ डेंग्यूचे रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यातील डेंग्यूचे रुग्ण ७३८ वरुन ५४६ वर घसरले आहेत. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ४३६ वरुन २०८ पर्यंत घसरली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ग्रामीण भागात, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शून्य वरून ४९ वर पोहोचली आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ वरून २६ वर पोहचली आहे. .तसेच राज्यात चिकनगुनियाचे ४११ एकूण रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तर लेप्टोचे एकूण रुग्ण ९६६ असून यातील ६ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. मुंबईत ९२० तर ठाणे मनपा क्षेत्रात ७ असे मिळून राज्यात ९५ टक्के रुग्ण मिळून मुंबई ठाणे दोन जिल्ह्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here