गोवर आजार नियंत्रण आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सुचना

@maharashtracity

मुंबई: मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर (vaccination) भर देत उपचाराधीन बालकांची विशेष काळजी घ्यावी. तसेच गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीव जागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी केल्या. 

मुंबईत पसरलेल्या गोवर (measles) आजार नियंत्रण आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल (BMC Commissioner I S Chahal) यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या माहितीनुसार मुंबईत १६४ बालकांना गोवरची (Govar) लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)  उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. 

लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे सांगितले. यावेळी लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे, तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू (religious leaders) यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here