@maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी १५१५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७९,८६,८११ झाली आहे. काल २,०६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,१६,९३३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९७.८७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २१,९३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात सोमवारी ३ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२१,४२,८४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,८६,८११ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ४३१ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४३१ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,१४,५५१ रुग्ण आढळले. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,६१९ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here