@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,८२,८०२ झाली आहे. काल २५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३३,०४३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१०% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १९०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात रविवारी एकही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०७,२२,६२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८२,८०२ (०९.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत २३४ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात २३४ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०,६१,९८६ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६६ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here