@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ४५५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,२४,७५४ झाली आहे. तर काल ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७४,०३१ कोरोनाबाधित रुग्ण (corona patients) बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २३६६ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात रविवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४९,५२,६०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२४,७५४ (०९.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १७२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १७२ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आतापर्यंत मुंबईत (Mumbai) एकूण ११,५०,४२० रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७३५ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here