बाराव्या जिनॉम सिक्वेसिंग अहवालाचा निष्कर्ष

@maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून बाराव्या जिनॉम सिक्वेसिंग (Genome sequencing) चाचणीचा निष्कर्ष अहवाल सोमवारी सांगण्यात आला. यात २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २०२ नमुने मुंबईतील होते. तर उर्वरित नमुने हे मुंबई बाहेरील होते. दरम्यान, मुंबईतील २०२ नमुन्यांपैकी ९९.५ टक्के म्हणजेच २०१ नमुने हे ओमिक्रॉन (Omicron) या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदान करण्यात आले. तर एक नमुना हा डेल्टा (Delta) या उपप्रकाराने बाधित असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

बाराव्या जिनॉम सिक्वेसिंगमध्ये घेतलेल्या २०२ नमुना चाचणीत ४४ टक्के म्हणजेच ८८ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील होते. तर ४१ ते ६० या वयोगटात २६ टक्के म्हणजेच ५२ एवढेच रुग्ण होते. १६ टक्के म्हणजेच ३२ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील होते. तसेच १२ टक्के म्हणजेच २४ रुग्ण हे ’० ते २०’ या वयोगटातील होते. तसेच २ टक्के म्हणजे ५ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील होते असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान ० ते १८ या वयोगटातील २४ नमुने, १ नमुना हा ० ते ५ वर्षे वयोगटातील, १० नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील तर १३ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ओमिक्रॉन या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. मात्र, रुग्णांत कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नसल्याचे सांगण्यात आले.

तसेच यात २०२ पैकी २ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतली होती. तर दोन्ही मात्रा घेतलेल्या १२९ रुग्णांपैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. तसेच ७१ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मुंबईत आढळले बीए४ बीए५ व्हेरियंट

दरम्यान, या बाराव्या जिनॉम सिक्वेसिंग चाचणी अहवालात बीए४ तसेच बीए५ व्हेरियंट मुंबईत आढळला. २०१ ओमिक्रॉन या उप प्रकाराने बाधित रुग्णांपैकी बीए४ चे तीन आणि बीए५ व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला. यात दोन ११ वर्षाच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत आणि मागील १५ दिवसमध्ये त्यांनी बाहेच्या देशात किंवा राज्यात प्रवास केलेला नाही.

बीए४ च्या तीन रुग्णांपैकी ११ वर्षाच्या मुली लसीकरणाच्या वयोगटात मोडत नाही व उर्वरित एक रुग्ण अॅलर्जीने बाधित असल्यामुळे त्याने देखील लसीची एकही मात्र घेतली नाही. तर Qबीए५ व्हेरीयंटच्या रुग्णाने लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here