राज्यात बीए.५ व्हेरीयंटचे २६ रुग्ण तर बी ए.२.७५ चे १३ रुग्ण

@maharashtracity

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (National Institute of Virology) आणि बी जे वैद्यकीय संस्था (B J Medical Institute) यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ चे २६ रुग्ण तर बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील १३ रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी व्हेरियंट रुग्णांची नोंद झाली.

यातील २३ रुग्ण मुंबई तर १३ रुग्ण पुणे येथील आहेत. याशिवाय प्रत्येकी १ रुग्ण बुलढाणा, ठाणे आणि लातूर येथील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १५८ तर बी ए. २.७५ रुग्णांची संख्या ७० झाली आहे.

दरम्यान सोमवारी नोंद झालेले सर्व व्हेरियंट रुग्ण २९ जून ते ४ जुलै २०२२ या काळातील असून या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. तसेच जिल्हा निहाय पाहिल्यास बीए.४ आणि ५ च्या रुग्णांत पुणे येथे ९१, मुंबईत ५१, ठाणे येथे ५, तर नागपूर आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ४, रायगड जिल्ह्यात ३ असे सांगण्यात आले.

तसेच बीए.२.७५ रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यात ४३, नागपूर १४, मुंबई ५, अकोला ४, तर ठाणे, यवतमाळ, बुलढाणा, लातूर जिल्ह्यात प्रत्येकी १ असे असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ११११ नवीन रुग्णांची नोंद :
राज्यात सोमवारी ११११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,२०,५०२ झाली आहे. काल १४७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,५७,३१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १५१६२ सक्रिय रुग्ण आहेत.

तसेच राज्यात सोमवारी एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२६,५७,२८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,२०,५०२ (०९.७० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १६७ बाधित :
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६७ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११२०३४० रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९६३२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here