@maharashtra.city

मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मंगळवारी पालिका सुरक्षादलातील सुरक्षा रक्षकांसाठी भायखळा येथील राणीच्या बागेत आयोजित योग शिबिर संपन्न झाले.

मुंबई महापालिकेचे सुरक्षा दल व राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय’ यांच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त राणीच्या बागेत पालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली योग शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजीत तावडे, सुरक्षा अधिकारी व प्राणिसंग्रहालयातील अधिकारी आणि कर्मचारी या शिबिरास उपस्थित होते. या सर्वांनी योग आणि ध्यान ह्या सत्रामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here