@maharashtracity

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल येथे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी करत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल येथे आज धडक मोर्चा काढण्यात आला. 

पिकांच्या पंचनाम्यात ५० आणेवरी आली पाहिजे या प्रमुख मागणीसह शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, तसेच ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करा आदी मागणींसाठी मोर्चा काढण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले. 

अंबादास दानवे आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेताची (crop loss due to heavy rain) पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. दानवे म्हणाले की, “संकट कितीही मोठे असले तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून उभी आहे. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत व तातडीची नुकसान भरपाई दिली पाहिजे, शेतीचे पंचनामे झाले पाहिजेत.”

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांच्यासोबत जिल्ह्यातील विकासकामे व शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आढावा बैठक घेतली.

धरणगाव मध्ये सरसकट पंचनामे करा

धरणगाव तहसील कार्यालय येथे दानवे यांनी अतिवृष्टीबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत शेतीच्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे (punchnama) करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले. दिवाळी आनंदी शिधा ही योजना नियोजन अभावी फसली असून अनेकांना आजही शिधा मिळाली नसल्याची तक्रार सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मागील काही महिन्यांपासून बैठक घेतली नसल्याची बाब देखील दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, धरणगावच्या पाणी पुरवठाविषयी गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बैठकीत चांगलेच वाभाडे काढले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here