मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) विधानपरिषद (Upper House) निवडणुकीत (polls) नवीन चेहऱ्यांना (young blood) साधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) बुधवारी रात्री पक्ष नेत्यांच्या बैठकीत घेतल्याचे समजते. पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे नाव मागे पडल्याचे समजते. नवीन चेहरे घेण्याची चर्चा असली तरी सोलापुरातून (Solapur) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि ठाणे (Thane) पट्ट्यातून महेश तपासे (Mahesh Tapase) आणि आशीष दामले (Ashish Damle) यांचेही नाव समोर आले आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेस (Congress) दोन जागा लढवण्याचा प्रयत्न करत असली तरी काँग्रेसच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असल्याने पुण्यातून उमेदवारी द्यायचीच झाली तर अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानला जाईल. पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) हे मंत्रिमंडळात आहेत. याशिवाय इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले दत्तात्रय उर्फ दत्ता मामा भरणे (Datta Bharane) यांनादेखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळलेले आहे. पुणे जिल्ह्यातून पक्षाचे 9 आमदार (MLA) निवडून आले असल्याने विधान परिषदेवर पुन्हा पुणे जिल्ह्यातील व्यक्ती नको, असा पक्षात मतप्रवाह आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचे नाव बाद झाले आहे.

सोलापुरात पक्षाची ताकद कमी झाली आहे. पक्षाचे जुने जाणते प्रमुख नेते भारतीय जनता पक्षात (BJP) गेल्याने या जिल्ह्यातील मोहोळ (Mohol) मतदारसंघातील माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना परिषदेवर पाठवण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने पाटील यांना थांबावे लागले होते आणि त्याजागी रमेश कदम निवडून आले होते. कदम नंतर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकले.

भाजपकडून चार पैकी एका जागेसाठी सोलापुरातील तरूण नेते रणजित सिह मोहिते (RanjitSinh Mohite Patil) पाटील यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून राष्ट्रवादी कडून राजन पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकेल, असे सूत्रांकडून कळते.

ठाणे जिल्ह्यातील दोन युवा नेतृत्व कल्याणचे (Kalyan) महेश तपासे आणि बदलापूरचे (Badlapur) आशिष दामले यांचे नाव शर्यतीत आहे. तपास हे शरद पवार यांचे विश्वासू आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. इग्रेजी भाषेवरील प्रभत्व आणि आर्थिक विषयासह राजकीय मुद्दयावर राष्ट्रीय स्वरावर पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे ही तापसे यांची जमेची बाजू आहे. त्यांचे आजोबा दिवंगत गणपतराव तापसे यांनी तत्कालीन महाराष्ट्र प्रांताचे पुनर्विकास मंत्री आणि नंतर राजस्थान राज्याचे राज्यपाल अशी सन्मानाची पदे भूषवली आहेत.

Ashish Damle

बदलापूरचे आशिष दामले हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. ठाणे जिह्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडझड सुरू होती, तेव्हा ठाण्यात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि ठाण्यापलीकडे तापसे आणि दामले यांनी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. दामले यांनी पक्ष विरोधी पक्षात असतांना, सत्ता नसताना सुरू केलेले ‘ताईज किचन’ ही अत्यल्प दरातील भोजन थाळी म्हणजे आताच्या शिवभोजन थाळीचे पालक म्हटली जाते. या दोघा नेत्यांची नावेही शर्यतीत आहेत, असे समजते.

Mahesh Tapase

दरम्यान, दोन जागा मागणे ही काँग्रेसची रणनीती असून आता केवळ जागा घेऊन राज्यपाल कोट्यात दोन ऐवजी तीन जागा पदरात पाडून घ्यायच्या अशी काँग्रेसची रणनीती असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here