@maharashtracity

मुंबई: मुंबईत बुधवारी एकूण ६ हजार ३२ कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली असली तरीदेखील गेल्या २४ तासात १८ हजार २४१ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालिका आरोग्य विभागाने सांगितले.

म्हणजे नव्या रुग्णसंख्येच्या तिपटीने बरे झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून रुग्ण दुपटीचा कालावधी (doubling rate) ३० दिवसांवरुन आता ६६ दिवसांवर गेला असल्याची बाब देखील आजच्या माहितीतून समोर आली.

दरम्यान, मुंबईत (Mumbai) आता एकूण कोरोना बाधितांची १,१७,९९९ झाली असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९,६६,९८५ झाली असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के इतका आहे. तसेच बुधवारी १२ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला असल्याने एकूण मृतांची संख्या १६,४८८ झाली असल्याचे पालिका आरोग्य विभागाने (health department) म्हटले आहे.

तसेच ३१,८६५ सक्रिय रुग्ण असून कोविड रुग्णवाढीचा दर १.०३ टक्के एवढा आहे. तर आज ६०,२९१ चाचण्या करण्यात आल्या असून आता पर्यंत १,४७,७८,०९५ एकूण चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here