कडकडीत पोलीस बंदोबस्तामुळे तणावपूर्ण शांतता

@maharashtracity

धुळे: धुळवडीच्या दिवशी दोन गटात झालेल्या दंगलीच्या (riot in Sakri) घटनेच्या निषेधार्थ बुधवारी साक्री शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी आपापली दुकाने, व्यवहार बंद ठेवले होते. गावात तणावपूर्ण शांतता होती. पोलीस प्रशासनाने देखील कुठलीही अनुचित घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये याकरीता बंदोबस्त तैनात केला होता.

साक्री (Sakri) शहरात धुळवडीचा सण साजरा होत असताना अनुचित घटना घडली. डीजे लावण्यावरून दोन गट आमने-सामने आल्याने दंगल उसळली. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विश्‍व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad – VHP) व बजरंग दल (Bajrang Dal) या हिंदुत्ववादी संघटनांच्या नावाने साक्री बंदचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारीत झाला. परिणामी, बुधवारी सकाळपासूनच साक्री शहरात सोनार गल्ली, नगर पंचायती जवळची बाजारपेठ, लक्ष्मी रोड, भाजी मार्केट, भाडणे रोड, सुतार गल्ली आदि भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मात्र, साक्री शहरातील रूग्णालये, औषधांची दुकाने, पेट्रोल पंप व शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू होती. शहरातील सामाजिक शांतता भंग होऊ नये, याकरीता पोलीस रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात आला होता. स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील हे साक्री शहरात सकाळपासून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here