चंद्रपुरात सापडली 8 फुटी रिंगचे अवशेष

@maharashtracity

मुंबई: शनिवारी सायंकाळपासून आकाशात एखादा मोठा तारा तुटून जमिनीच्या दिशेने झेपावतो असे दृश्य दिसू लागले. हे दृश्य उत्तर मध्य महाराष्ट्र पासून विरार, गुजरात भुज, राजकोट येथून स्पष्ट दिसत होते. कित्येकांनी याचे व्हीडिओ उतरवले. मात्र हा उल्कापात, ताऱ्याचे तुटणे की अन्य काही होत हे सुरुवातीला समजले नाही.

दरम्यान, जगभरातील खगोल अभ्यासकाना भारतातील ही घटना समाज माध्यमांवरून सांगण्यात आली. त्यानंतर खगोल निरीक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली. यावर एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद, संचालक श्रीनिवास औंधकर यांची समाजमाध्यमांवर पोस्ट फिरू लागली.

या पोस्टच्या माहितीनुसार औंधकर म्हणाले की, हे इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे आहेत. न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत.

आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चीत असल्याचे औंधकर म्हणाले.

दरम्यान खगोल अभ्यासक सुयोग देशमुख यांनी जॉनथेंन मॅकडवेल यांचे ट्विट पोस्ट करून हे चायनीज चँग झेन्ग 3B y77 चे अवशेष असून फेब्रुवारी 2021 मध्ये अवकाशात सोडले होते, असा दावा केला आहे. दरम्यान, या घटनेवर अद्याप जगात चर्चा सुरु आहे.

तसेच राजकोट येथील गोंडलच्या ग्रामीण भागात आकाशात उल्कासारखे काहीतरी दिसले, अशी नोंद केली. गुंडाळा, मोती खिलोरी, देरडीकुंभाजी, यासह अनेक गावांमध्ये रात्री आवाज नसलेली उल्कासदृश वस्तू आढळून आली. या अनोख्या हवाई दृश्याबद्दल लोकांमध्ये कुतूहल पसरले. ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here