@maharashtracity

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार याची माहिती

मुंबई: जर राज्य शासनाने तातडीने रेल्वेला प्रस्ताव दिल्यास शनिवारी होणाऱ्या एमपीएससी परिक्षेसाठी (MPSC exam) विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची (allow local train journey to MPSC students) परवानगी देण्यास रेल्वे तयार आहे, याबाबत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Union MoS Raosaheb Danve) यांनी सकारात्मकता दाखवल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी दिली.

शनिवारी होणाऱ्या एमपीएससी परिक्षेसाठी
मुंबई आणि उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती विद्यार्थ्यांनी आमदार अँड आशिष शेलार यांना केली. त्यानुसार तातडीने याबाबतची विनंती त्यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना दूरध्वनीवरुन केली.

हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले.

म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (CS Sitaram Kunte) यांना ही संपर्क करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्तता दाखवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परवानगी मिळू शकेल, अशी माहिती आमदार अँड आशिष शेलार यांनी ट्विटर वर दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here