Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईतील शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक- शिक्षकेतरांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या (पीएफ स्लिप) देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पी एफ खात्यातील रकमेचे तपशील मिळणार असल्याची दिलासादायक बाब घडणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी पाठपुरावा केला होता.

दरम्यान, वर्ष २०२०-२१ पर्यंतच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांचे वाटप शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्या वतीने करण्यात आले. आतापर्यंत ६० शाळांमधील शिक्षक- शिक्षकेतरांना स्लिपचे वाटप झाले असून उर्वरित शाळा व ज्युनिअर कॉलेज मधील पावत्या वाटप करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांच्या वेतनातून दरमहा पी एफ ची रक्कम कपात होत असते. वर्षाच्या शेवटी जिल्हा वेतन पथक कार्यालयातून वर्षभराच्या जमा रकमेची संपूर्ण माहिती पीएफ स्लिप मधून शिक्षकांना मिळत असते. यामध्ये पीएफमध्ये किती रक्कम आहे, किती रक्कम कपात होते आहे, याचे तपशील शिक्षकांना मिळत असते. अनेक शिक्षक पीएफमधून गृह खरेदी, घरदुरुस्ती, लग्नकार्य तसेच औषधोपचारसाठी कर्ज काढत असतात. यासाठी पी एफ पावत्यांची गरज भासते. यापुढे भविष्यात आता पीएफ च्या स्लिप शालार्थ मधूनच मिळणार असल्याने शिक्षक आता केव्हाही त्यांची रक्कम व पीएफ चा तपशील पाहू शकणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here