@maharashtracity

हितचिंतकांचे ट्विटमधून मानले आभार

मुंबई: राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सात दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी कोरोनामुक्त (corona free) झाले.

शरद पवार यांनी सोमवारी त्यांची कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली. त्याच वेळी या ट्विटमधून कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर तसेच प्रार्थना करणाऱ्या हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत.

शरद पवार यांनी २४ जानेवारी रोजी ट्विट करत कोविड-१९ (covid-19) बाधित झाल्याची माहिती दिली होती. त्याचवेळी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यावेळी त्यांनी केले होते. तसेच काळजीचे काही कारण नसून डॉक्टरांच्या सुचनेप्रमाणे उपचार सुरु करण्यात आले असल्याचेही पवार ट्विट मध्ये म्हणाले होतेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here