@maharashtracity

ऑक्टोबर अखेर पर्यंत ३० दात्यांचे अवयवदान

मुंबई: यावर्षी ऑक्टोबरच्या महिना अखेरपर्यंत मुंबईत ( Mumbai) ३० दात्यांनी मरणोत्तर अवयवदान (Organ donate) केल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आलेख उंचावताना दिसून येत आहे. मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ९८ अवयवांचे प्रत्यारोपण केले असून यातील काही अवयव अन्य विभागातून मुंबईला मिळालेले आहेत.

यात ४१मूत्रपिंड , २७ यकृत, एक मूत्रपिंड आणि यकृत, दोन मूत्रपिंड आणि स्वादुपिंड, १६ हृदय, तीन फुप्फुसांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. तसेच यात एका रुग्णावर दोन्ही तर एका रुग्णावर एका हाताचेही प्रत्यारोपण केले आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे अवयवदान चळवळ धीम्या गतीने चालले होते. मात्र झेडटीसीसीने ( ZTCC) केलेल्या जनजागृकतेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यातच मागील वर्षीच्या अवयव दानाशी बरोबरी करता आली. मात्र मागील वर्षी ३० अवयव दाते मिळण्यासाठी झेडटीसीसीला डिसेंबर महिन्याची वाट पहावी लागली होती
मात्र यंदा ऑक्टोबर मध्येच ३० दात्यांचे अवयवदान झाले आहे. अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य समन्वयक उर्मिला महाजन (Urmila Mahajan, Chief Coordinator, Organ Transplant Committee ) यांनी दिली.

शहरात २०१९ मध्ये ७९ दात्यांकडून अवयवदान करण्यात आले. गेल्या दोन दशकातील हे सर्वाधिक अवयवदान होते. मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपणावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला. रुग्णांमध्येही करोनाबाधित होण्याची भीती असल्यामुळे रुग्णालयात त्यांच्या कुटुबियांकडून अवयव दानाला प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची संख्या ३० पर्यंत घटली. तरी देखील मागील राज्यात मुंबई अवयव दानात अव्वल ठरली. २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर अवयवदान आणि प्रत्यारोपणाने पुन्हा वेग घेतला.

त्यामुळेच गेल्या दहा महिन्यांमध्ये ३० दात्यांचे अवयवदान झाले. यावर्षी मुंबई आणि राज्याने करोना काळातही अवयवदान आणि प्रत्यारोपण वाढविण्यावर अधिक भर दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

गेल्या वर्षापासून आतापर्यंत मुंबईत १८९ अवयवांचे प्रत्यारोपण केले गेले, तरी एकाही रुग्णाला किंवा आरोग्य कर्मचाऱ्याला करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. ही प्रक्रिया करताना काळजी घेतली जात असल्यामुळेच आता रुग्णही प्रत्यारोपण करून घेण्यास हळूहळू पुढे येत आहेत.

येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक उर्मिला महाजन यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here